मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

आमचे संविधान..........

आमचे संविधान

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानतेचे भान
लोकशाहीचा नारा देते आमचे संविधान //धृ//

धर्मनिरपेक्ष लोकशाहीची
सदैव आम्हां जाण
लोकशाहीचे पाईक गातो समाजवादाचे गाण //१//

न्यायाचे अभिवचन देई,
प्रत्येक पान अन् पान
अभिव्यक्तीला प्रोत्साहन अन् विचारांना मान //२//

श्रद्धा, धर्म अन् उपासना,
याचे त्याला ज्ञान
दर्जाबरोबर संधी देते सर्वां एकसमान //३//

एकात्मता अन् एकता
ही तर राष्ट्राची जान
व्यक्तीमधल्या व्यक्तित्वाच्या प्रतिष्ठेची आण //४//

संविधानाच्या शिल्पकाराच्या
प्रज्ञेचे हेच खरे प्रमाण
धर्मग्रंथाहून श्रेष्ठ आम्हांला आमचे संविधान//५//

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा