गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

हम होंगे कामयाब....आम्ही होवू यशस्वी...





















आम्ही होवू यशस्वी....

होवू यशस्वी ,होवू यशस्वी
आम्ही होवू यशस्वी एक दिन ........

हो हो मनोमनी आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास,
आम्ही होवू यशस्वी एक दिन.

होईल शांती सर्वदूर,
असेल शांती सर्वदूर,
होईल शांती सर्वदूर एक दिन.
हो हो मनोमनी आहे विश्वास,
आम्ही होवू यशस्वी एक दिन ......

आम्ही चालू एकसाथ,
देवून हातात हात,
हो हो मनोमनी आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास,
आम्ही चालू एकसाथ,एक दिन.

आम्ही नाही एकटे,
आम्ही नाही एकटे,
आम्ही नाही एकटे आज,हे दिन...
सारे जग पाठीशी आज,हे दिन.
हो हो मनोमनी आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास,
आम्ही होवू यशस्वी एक दिन.


नाही भीती कुणाची आज,
नाही भय कुणाचे आज,
नाही भीती कुणाची आज,हे दिन,
मनोमनी आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास,
आम्ही होवू यशस्वी एक दिन.

हो हो मनोमनी आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास,
आम्ही होवू यशस्वी एक दिन.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
  मोबाईल-9923847269

मूळ रचना-महालिया जेक्सन
mahaliya jacksan

मराठी अनुवाद-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

30november2018



जन्म घेऊ दे ग


गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

नको मा रू गं आई,जन्म घेऊ दे गं मला





नको मारू गं आई,जन्म  घेऊ दे गं मला


नको मारू गं आई,जन्म  घेऊ दे गं मला
आई सावित्रीची आई, आई शपथ गे तुला ।।धृ।।

उद्या दोन्हीही कुळाचा मी उद्धार करीन
तुझ्या दुधाच गं कर्ज,व्याजासहीत फेडीन
जग बघण्या गं आई,जीव आतुर हा झाला।।१।।

घास-घासातला खाईन,मी  शाळेला जाईन
आई शिकून सवरून मी सावित्री होईन,
उगी तुझा गं जीव कसा हबकून गेला ।।२।।

आई मुलगा-मु लगी,आहे एकच समान
आई सावित्री मातेशी तु राख गं इमान
बघ माझ्या गं सपनांचा झुला आकाशी गं गेला।।३।।

तू नाहीस कसाई,तू आहेस गं आई,
सांग उद्याच्या जगाला,कुठून आणायची आई?
तुझं पटेल गं आई,सांग माझ्या बाबाला ।।४।।

-सूर्यकांत डोळसे ,पाटोदा (बीड)
 मोबाईल-9923847269

नको मारू गं आई,जन्म घेऊ दे गं मला


शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

फिनिक्सच्या कविता



































फिनिक्सच्या कविता

फिनिक्सच्या
डोळ्यातील खुणा
दाखवितात
जळताना झालेल्या
यम यातना.
......

फिनिक्स
आपल्या दु:खाबाबत
असतो नेहमीच मुका.
हीच त्याच्या आयुष्याची
एक शोकांतिका.
.......

तू म्हणाली असतीस तर
मीही फिनिक्स
बनलो असतो.
भरारी मा रताना
तुला कधीच दिसलो
 ....

फिनिक्स एक
चिरंतन दु:ख असते.
त्याची कथा ऐकण्यात
अलभ्य सुख असते.
.........

प्रत्येकजण एक
फिनिक्सअसतो.
भरारी मारण्यासाठी
जळण्यास तयार नसतो.
.........

फिनिक्सच्या दु:खाला
काळाचे माप नसेल !
चिरंजीवित्त्वाचा
तो एक शाप असेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

साप्ताहिक सकाळ।२फेब्रुवारी १९९१