शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८
फिनिक्सच्या कविता
फिनिक्सच्या कविता
फिनिक्सच्या
डोळ्यातील खुणा
दाखवितात
जळताना झालेल्या
यम यातना.
......
फिनिक्स
आपल्या दु:खाबाबत
असतो नेहमीच मुका.
हीच त्याच्या आयुष्याची
एक शोकांतिका.
.......
तू म्हणाली असतीस तर
मीही फिनिक्स
बनलो असतो.
भरारी मा रताना
तुला कधीच दिसलो
....
फिनिक्स एक
चिरंतन दु:ख असते.
त्याची कथा ऐकण्यात
अलभ्य सुख असते.
.........
प्रत्येकजण एक
फिनिक्सअसतो.
भरारी मारण्यासाठी
जळण्यास तयार नसतो.
.........
फिनिक्सच्या दु:खाला
काळाचे माप नसेल !
चिरंजीवित्त्वाचा
तो एक शाप असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
साप्ताहिक सकाळ।२फेब्रुवारी १९९१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा