नको मारू गं आई,जन्म घेऊ दे गं मला
आई सावित्रीची आई, आई शपथ गे तुला ।।धृ।।
उद्या दोन्हीही कुळाचा मी उद्धार करीन
तुझ्या दुधाच गं कर्ज,व्याजासहीत फेडीन
जग बघण्या गं आई,जीव आतुर हा झाला।।१।।
घास-घासातला खाईन,मी शाळेला जाईन
आई शिकून सवरून मी सावित्री होईन,
उगी तुझा गं जीव कसा हबकून गेला ।।२।।
आई मुलगा-मु लगी,आहे एकच समान
आई सावित्री मातेशी तु राख गं इमान
बघ माझ्या गं सपनांचा झुला आकाशी गं गेला।।३।।
तू नाहीस कसाई,तू आहेस गं आई,
सांग उद्याच्या जगाला,कुठून आणायची आई?
तुझं पटेल गं आई,सांग माझ्या बाबाला ।।४।।
-सूर्यकांत डोळसे ,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा