सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

भिक्षापात्र





































भिक्षापात्र

एका कातरवेळी
बुद्ध आणि येशू
बसले होते चर्चा करीत
जागतिक शांततेची.

येशूने शांततेसाठी
आपल्या शरीरातील
खिळे काढले अन
ठेवले बुद्धाच्या
भिक्षापात्रात.

बुद्धाचं भिक्षापात्र
केंव्हाच भरलं आहे.
पण....
येशूच्या शरीरातील
खिळे अजूनही संपत नाहीत.

तेंव्हापासून बुद्धाचं भिक्षापात्र
आणि बुद्धही
वाट बघत आहेत,
खिळ्यांच्या संपण्याची !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
 मोबाईल- 9923847269

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा