सूर्यकांत डोळसे यांच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सूर्यकांत डोळसे यांच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८
भिक्षापात्र
भिक्षापात्र
एका कातरवेळी
बुद्ध आणि येशू
बसले होते चर्चा करीत
जागतिक शांततेची.
येशूने शांततेसाठी
आपल्या शरीरातील
खिळे काढले अन
ठेवले बुद्धाच्या
भिक्षापात्रात.
बुद्धाचं भिक्षापात्र
केंव्हाच भरलं आहे.
पण....
येशूच्या शरीरातील
खिळे अजूनही संपत नाहीत.
तेंव्हापासून बुद्धाचं भिक्षापात्र
आणि बुद्धही
वाट बघत आहेत,
खिळ्यांच्या संपण्याची !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल- 9923847269
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
