बुधवार, ७ मार्च, २०१८

आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....

महिला दिन विशेष
-----------------------
आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....
आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....
आमच्या आयुष्याला,आमच्या भविष्याला नवा आकार देणार।।धृ।।
हिरकणीची,झाशीच्या राणीची,आम्ही घोषणा देणार
राणी अहिल्यादेवीची,आम्ही किर्ती गाणार।।१।।
जगदंबेची,महदंबेची,आम्ही लिळा गाणार
मिरेच्या भक्तीची,राधेच्या शक्तीची आम्ही पूजा बांधणार।।२।।
मुक्ताईचा,श्यामच्या आईचा,आम्ही वसा घेणार
जनाबाईच्या अभंगाला नवा अर्थ देणार ।।३।।
आण रमाईची,जाण भिमाईची,पुढे पुढेच नेणार
तारा आईची,बहिणाबाईची आम्ही भाषा बोलणार।।४।।
नव्या आकाशाला,नव्या प्रकाशला आमची 'कल्पना' येणार
मायेची पाखर,तोंडी साखर,'मदर' घालणार ।।५।।
हाती क्रांतीची,हाती शांतीची,आम्ही मशाल घेणार
स्त्रीमुक्तीचे.स्त्रीशक्तीचे आम्ही गाणे गाणार ।।६।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९
------------------------------------
दैनिक पुण्यनगरी | ८मार्च2018


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा