बुधवार, ७ मार्च, २०१८

आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....

महिला दिन विशेष
-----------------------
आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....
आम्ही सावित्री होणार...आम्ही जिजाऊ होणार....
आमच्या आयुष्याला,आमच्या भविष्याला नवा आकार देणार।।धृ।।
हिरकणीची,झाशीच्या राणीची,आम्ही घोषणा देणार
राणी अहिल्यादेवीची,आम्ही किर्ती गाणार।।१।।
जगदंबेची,महदंबेची,आम्ही लिळा गाणार
मिरेच्या भक्तीची,राधेच्या शक्तीची आम्ही पूजा बांधणार।।२।।
मुक्ताईचा,श्यामच्या आईचा,आम्ही वसा घेणार
जनाबाईच्या अभंगाला नवा अर्थ देणार ।।३।।
आण रमाईची,जाण भिमाईची,पुढे पुढेच नेणार
तारा आईची,बहिणाबाईची आम्ही भाषा बोलणार।।४।।
नव्या आकाशाला,नव्या प्रकाशला आमची 'कल्पना' येणार
मायेची पाखर,तोंडी साखर,'मदर' घालणार ।।५।।
हाती क्रांतीची,हाती शांतीची,आम्ही मशाल घेणार
स्त्रीमुक्तीचे.स्त्रीशक्तीचे आम्ही गाणे गाणार ।।६।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९२३८४७२६९
------------------------------------
दैनिक पुण्यनगरी | ८मार्च2018


गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

जिजाऊ वंदना







































जिजाऊ वंदना

गावू जिजाऊ जिजाऊ
आऊ जिजाऊ जिजाऊ
माता जिजाऊ जिजाऊ
नेता जिजाऊ जिजाऊ..।।धृ।।

स्वराज्य प्रेरणा जिजाऊ
स्वराज्य धारणा जिजाऊ
लोकांचा आधार जिजाऊ
स्वराज्य निर्धार जिजाऊ ।।१।।

जाधवांची लेक जिजाऊ
भालाफेक जिजाऊ
भोसल्यांची सून
स्वातंत्र्याची
धून जिजाऊ ।।२।।

राजा शिवाजी जिजाऊ
राजा संभाजी जिजाऊ
स्वराज्य मंत्र जिजाऊ
स्वराज्य तंत्र जिजाऊ ।।३।।

स्वराज्य आण जिजाऊ
स्वराज्य शान जिजाऊ
स्वराज्य पूज्य जिजाऊ
आम्ही सज्ज जिजाऊ ।।४।।

आम्ही होवू जिजाऊ
आम्ही गावू जिजाऊ
आम्ही लेवू जिजाऊ
आम्ही होवू जिजाऊ ।।५।।

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
 मोबाईल.९९२३८४७२६९

------------------------------

दैनिक पुण्यनगरी ,दैनिक झुंजार नेता
१२जानेवारी२०१८

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

नव वर्षाची प्रार्थना






































क।वि।ता

नव वर्षाची प्रार्थना

नव्या आशा,नवी उषा,आसुसलो रे नव स्पर्शा ,
स्वागत करतो,स्वागत करू दे,येरे ये नव वर्षा || धृ ||
अनादी तू,अनंत तू,सृष्टीच्या कालगतीचा पंथ तू,
सामंजस्याने चालत राहू,आमच्या ओठी नको इर्षा ||१||
कितीदा येतो,कितीदा जातो,तोच आनंद पुन्हा होतो,
आनंद देवू ,आनंद घेवू,तुझ्यापुढे झुकवू शीर्षा ||२||
नवा श्वास तू,नवा सूर तू,नवी नवी हुरहूर तू,
नवे हर्ष तू,नवे वर्ष तू,घेवून येरे,ये तू हर्षा ||३||
पेलत राहू,झेलत राहू,संकटांशी बोलत राहू,
शक्ती-भक्तीची प्रेरणा,फक्त तुझिया स्पर्शा ||४||
अनुभवाची तू शिदोरी,घास घ्याया कुठली चोरी ?
रूपे तुझी वर्णू किती,शिशीर,हेमंत,शरद,वर्षा ||५||
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
दैनिक पुण्यनगरी।दैनिक झुंजार नेता
1जानेवारी 2018
---------------------------------------