मी आलो आहे....२०१७ ची साद
लुकलूकणार्या तार्यातून आलो आहे,भिरभिरणार्या वार्यातून आलो आहे.खोल खोल दर्यातून आलो आहे,उंच उंच खोर्यातून आलो आहे.
मांगल्याचा जयघोष करणार्यागगनभेदी भरार्यातून आलो आहे.झुळझुळणार्या झर्यातून आलो आहे,एवढेच काय?भल्या-बुर्यातून आलो आहे.
तुमच्या जल्लोषी स्वागतानेमी पुन्हा जिंदादिल झालो आहे....मी आलो आहे...मी आलो आहे......॥१॥
पाखंड्यांच्या टोळ्यातून आलो आहे,माणूसकीच्या होळ्यातून आलो आहे.असहिष्णूतेच्या जाळ्यातून आलो आहे,खेळियांच्या खेळ्यातून आलो आहे.
कुणाच्या खोकड चाळ्यातून आलो आहे,कुणाच्या माकड चाळ्यातून आलो आहे.मस्तावलेल्या बोकडांच्या ताब्यातीलगरीब शेळ्यांच्या ताब्यातून आलो आहे.
इथले सगळेच डावपेचमी कोळून प्यालो आहेमी आलो आहे...मी आलो आहे....॥२॥
कुचकट शेर्यातून आलो आहे,शनीच्या फेर्यातून आलो आहे.संधीसाधूंच्या डेर्यातून आलो आहेवांझोट्यांच्या बजबजपुर्यातून आलो आहे.
धर्म,जात,पंथ,भाषा,प्रांतयांच्या भेदक मार्यातून आलो आहे.राष्ट्रवादाला आव्हान देणार्याभेदक मार्यातून आलो आहे.
मलाच कळेना,मी पुढे जातो की,मागे मागे गेलो आहे....मी आलो आहे....मी आलो आहे ॥३॥
कोण काय खातो? हे बघत आलो आहे,कोण काय लेतो?हे बघत आलो आहे.गावकुसातल्या आतल्याबरोबरबाहेरचेही जग मी जगत आलो आहे.
मी नागणारे बघत आलो आहे,मी नागविणारे बघत आलो आहे.सुधारल्याचा आव आणीततसेच वागणारे बघत आलो आहे.
इथे कुणीच सांगत नाहीमी वाघाचे कातडे ल्यालो आहेमी आलो आहे....मी आलो आहे.....।४॥
कोंबड्यांच्या बांगेतून आलो आहे,एटीएमच्या रांगेतून आलो आहे.एकमेकांना मारलेल्यालाथाळ्या आणि टांगेतून आलो आहे.
मी नटसम्राटाच्या विंगेतून आलो आहे,मी हिटलरच्या झिंगेतून आलो आहे.गोमातेचे राजकारण करणार्याकठाळ्यांच्या जांघेतून आलो आहे.
तेहतीस कोटी देव दिमतीलातरी राक्षसांना भ्यालो आहे.मी आलो आहे....मी आलो आहे.....॥५॥
मी खालच्यातून आलो आहे,मी वरच्यातून आलो आहे.एकही शिल्लक उरला नसेल,मी मोर्चातून आलो आहे.
सगळ्यांच्या नाकाला झोंबणार्यामी मिरच्यातून आलो आहे.कुणी देश सोडा म्हणणार्यांसाठी,मी घरच्यातून आलो आहे.
रंगुन रंगात सार्यामी तिरंग्यात न्हालो आहे.मी आलो आहे....मी आलो आहे.....॥६॥
मला याड लागलं नाही,मला फ्याड लागलं नाही.किंगफिशरने मारली भरारीमला ग्वाड लागलं नाही.
मी झिंगून आलो आहे,मी पंगून आलो आहे.मी थोडाही सैराटलो नाही,मी रंगुन आलो आहे.
आर्ची आणि परश्याकधीच झालो आहेमी आलो आहे....मी आलो आहे..... ॥७॥
मी ब्लॅक मनीतून आलो आहे,मी व्हाईट मनीतून आलो आहे.दोन नंबरचे शिक्के लेवूनमी काळ्या गोण्यातून आलो आहे.
तिजोरीत जाऊन व्हाईट झालो आहे,कुणा-कुणाला वाईट झालो आहे.कुणा-कुणासाठी टाईट झालो आहे,मेरे देशवासियोंचा आवाज आवाज ऐकूनमीही दचकून गेलो आहे
मी आलो आहे....मी आलो आहे.....॥८॥
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-९९२३८४७२६९
दैनिक पुण्यनगरी । दैनिक झुंजार नेता१जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा